ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौरा कार्यक्रमात पुन्हा बदल झाला असून आता ते दुपारी पावणे तीन वाजता नांदेडमध्ये येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात हा तिसऱ्यांदा बदल झाला आहे. सुरुवातीला ते रविवारी नांदेड मुक्कामी येऊन दोन दिवसीय दौरा करणार होते. नंतर त्यात बदल होऊन ते रविवारी मुक्कामी न येता आज सोमवारी सकाळी 11.15 वाजता नांदेडमध्ये येणार होते. पण आता त्यातही बदल झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी पावणे तीन वाजता नांदेडमध्ये येत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सुधारित दौरा देण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटाला ते श्री गुरुगोविंद सिंग विमानतळ येथे विशेष विमानाने येणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन ते तीन वीसपर्यंत सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेऊन पुढे तीन वाजून 40 मिनिट ते चार वाजून 15 मिनीटापर्यंत खासदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेस भेट आणि राखीव. त्यानंतर सायंकाळी 4.20 ते 4.55 च्या दरम्यान नांदेड उत्तर मतदार संघातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास मालेगाव रोडवर असलेल्या भक्ति लॉन्स येथील मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी साडेपाच वाजता नांदेड येथून त्यांचा ताफा हिंगोलीकडे प्रयाण करणार आहे. सायंकाळी सव्वा सहा ते सातच्या सुमारास भव्य कावड यात्रेस त्यांची उपस्थिती राहणार असून हिंगोलीच्या अग्रसेन चौक नांदेड नाका येथे आमदार संतोष बांगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्री साडेसात वाजता गांधी चौक हिंगोली येथे आमदार बांगर यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधन करणार आहेत. रात्री आठ पंचेचाळीस ते नऊच्या सुमारास आमदार बांगर यांच्या सावरखेडा येथील फार्म हाऊसला ते भेट देणार आहेत. रात्री नऊ वाजता हिंगोली येथून त्यांचा ताफा औंढा नागनाथकडे जाणार आहे. रात्री साडेनऊ वाजता औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व रात्री दहा वाजता औंढा नागनाथ येथून वसमत मार्गे मोटारीने नांदेड विमानतळाकडे येणार आहेत. रात्री 10:45 वाजता नांदेड विमानतळ येथून आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
मात्र यापूर्वी जाहीर झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये नांदेड शहरातील विविध विकास कामांचा आढावा तसेच पासदगाव येथील आसना पुलाचे भूमिपूजन आणि नांदेड- निळा रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन हे कामे त्यांनी आपल्या दौऱ्यातून वगळले आहेत. तसेच छत्रपती चौक येथील कार्यक्रमही रद्द केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- 👇🏻
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻