ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड- मेरी नावाच्या व्यक्तीने कॉल करून एकास अडीच लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. दुसऱ्या एका घटनेत एकाची सव्वा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या दोघांना ऑनलाईनद्वारे जवळपास चार लाखाचा गंडा घालणाऱ्या अज्ञातांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहराच्या साईबाबानगर पूर्णा रोड, नांदेड येथील राजेंद्र विठ्ठलराव ताडोड यांच्या फोनवर 27 नोव्हेंबर ते एक डिसेंबर 2022 च्या दरम्यान टेलिग्राम या ॲपवरून मेरी नावाच्या व्यक्तीकडून चित्रपट बॉक्स ऑफिस सुधारण्यासाठी व तिकीट वाढविण्यासाठी डेटा वापरून बॉक्स ऑफिसची विक्री व प्रतिष्ठा सुधारून तिकीट विक्री वाढवू शकतो यावर आपणास कमिशन दिले जाईल असा संदेश आल्याने राजेंद्र ताडोड यांना ट्रायल म्हणून मेरी या व्यक्तीने लिंक पाठवली. या लिंकद्वारे आरोपीने वेळोवेळी ताडोडच्या वेगवेगळ्या खात्यातून दोन लाख 60 हजार 384 रुपये ऑनलाइनद्वारे काढून घेऊन आर्थिक फसवणूक केली. राजेंद्र ताडोड यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात मेरी नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणूक आणि सहकलन 66 ( ड ) आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसऱ्या घटनेत ज्ञानेश्वरनगर येथील धनंजय नागोराव पत्की यांनी फ्लिपकार्टवरून मोटोरोला कंपनीचा मोबाईल ऑर्डर केला. परंतु त्याची ऑर्डर तीन वेळा रद्द होत असल्याने त्यांनी कस्टमर केअरच्या ९१२२६२३३३१०० वर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की तुमचे पैसे जमा होत नाहीत. यासाठी तुमचा डेबीट कार्ड नंबर कळवा असे सांगितले. पैसे जमा होत नसल्याने डेबिट कार्ड नंबर दिला. यावेळी त्यांच्या डेबिट व क्रेडिट वरून एक लाख 31 हजार 600 रुपयाची ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात आली. धनंजय पत्की यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात वरील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आडे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻