ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग, नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील जे कोणी नागरीक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुखरूपपणे भारतात परत येता यावे यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी संपर्क साधून मदतीची यंत्रणा तत्पर ठेवली आहे. हे लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील जर कोणाचे नातलग, कुटुंबातील सदस्य, विद्यार्थी युक्रेनमध्ये असतील त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही समन्वयाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणी अडकले असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करता येईल. नातलगांसाठी तहसिल कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1077 किंवा (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवसी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. १८००११८७९७ (टोल फ्री), +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५ आहे व फॅक्स नंबर +९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई-मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻