ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- ‘मोदी@९’ महासंपर्क अभियानांतर्गत राज्यभर कार्यक्रम सुरु आहेत. उद्या शनिवार, दि. १० जून रोजी नांदेडमधून या अभियानाची सुरुवात होणार असून यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भव्य जाहीर सभा नांदेडमध्ये पार होणार आहे.
उद्याशनिवार दि. १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातहून नांदेडकडे रवाना होणार आहेत. नांदेड विमानतळावर सायंकाळी 5 वाजता त्यांचे आगमन होईल. विमानतळाहून थेट ते सभास्थळी रवाना होतील. महाराष्ट्रातील मोदी महाजनसंपर्क अभियानाचा शुभारंभ नांदेडपासून करण्यात येणार असल्यामुळे अमित शाह यांची ही सभा जंगी करण्याचे नियोजन जिल्हा व शहर भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.
उद्या दि. १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नांदेड शहरातील बाफना चौकाजवळील अबचलनगर येथील मोकळ्या मैदानावर ही सभा होईल. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकारमंत्री अतुल सावे, जनसंपर्क अभियानाचे मराठवाडा प्रमुख आमदार प्रविण दरेकर, यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख भाजप नांदेडमध्ये येत आहेत.
याशिवाय नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपचे शहर महानगराध्यक्ष प्रविण साले, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार आदी उपस्थित असणार आहेत.
या अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर यांच्याकडून नुकताच या सभेचा आढावा घेण्यात आला. नांदेड येथे होणारी अमित शहा यांची सभा रेकॉर्ड ब्रेक ठरेल विश्वास आ. दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. देशभर महाजनसंपर्क अभियान सुरु आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोगा जनतेसमोर मांडणारे महाजनसंपर्क अभियान महाराष्ट्रात सुरु होत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील अभियानांतर्गत पहिली जाहीर सभा दि. १० जून रोजी अबचल नगर येथे होणार आहे. या सभेसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.
सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा -खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, प्रवीण साले यांचे आवाहन
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची उद्या दिनांक 10 जून रोजी सायंकाळी चार वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा मैदान, बाफना टी पॉईंट, अबचलनगर जवळ विशाल सभा आयोजित करण्यात आली आहे .या सभेला, राज्याचे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, पालक मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या विशाल सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर , भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. गेल्या नऊ वर्षात भारत सरकारने या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण केली. शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचत असताना विकासाचा समतोल राखला आहे . देशात हिंदुत्ववादी विचारसरणीला अंगीकारून भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून होत आहे . त्यामुळे गेल्या नऊ वर्षाच्या काळात देशात अमुलाग्र असा बदल झाला आहे. राष्ट्रीय महामार्गापासून ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या घरांच्या निर्मितीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिलेले योगदान अतुलनीय आणि अविस्मरणीय असेच आहे. शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच देशांमध्ये पिक विमा सारखा महत्वकांशी प्रकल्प आणि अभियान राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने देशात शेतकऱ्यांचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षात देशाची सर्वच क्षेत्रात आणि सर्वच आघाड्यांवर प्रचंड अशी प्रगती होते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारा भारत हा एकमेव राष्ट्र असल्याने पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आता जगाने स्वीकारले आहे. या नेतृत्वाला वैश्विक स्वरूपाची प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एक भक्कम आणि दणकट नेतृत्व म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते, असे खासदार चिखलीकर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने मोदी @९ हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही येत्या 30 जून पर्यंत हे अभियान राबविण्यात येत असून या अभियानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या दिनांक १० जून रोजी सायंकाळी चार वाजता नांदेडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात नांदेड येथून होत आहे. या शुभारंभासाठी केंद्रीय नेतृत्व येत असल्याने नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीतील शेवटच्या घटकापर्यंतचा कार्यकर्ता उपस्थित राहणे अपेक्षित आहे असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या विशाल जाहीर सभेला नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनांसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्था
या सभेसाठी येणाऱ्या वाहनासाठी लोहा कंधार तालुक्यातील येणाऱ्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था नवीन कवठा लंगर साहेब गुरुद्वारा, साईबाबा कमानी जवळ केली आहे .तर देगलूर मुखेड बिलोली तालुक्यातून येणाऱ्या वाहनाची पार्किंग व्यवस्था केळी मार्केट , इतवारा मैदान नांदेड येथे केली आहे .भोकर, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, नायगाव या भागातून येणाऱ्या वाहण्याची पार्किंगची व्यवस्था खालसा हायस्कूल मैदान येथे केली आहे.नांदेड शहरातील वाहनाची पार्किग यात्री निवास गुरुव्दारा नांदेड येथे केली असल्याचे सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻