ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आ. शिंदे स्थानिक पातळीवर खा. चिखलीकर आणि भाजपविरोधात
नांदेड- राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवावरून आता नांदेड जिल्हाही चर्चेत असून लोहा- कंधारचे आ. शामसुंदर शिंदे हे शिवसेना नेते।खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर आले।आहेत. या पराभवाबाबत पत्रकार परिषदेत बोलताना खा. राऊत यांनी यांच्यावर आ. शामसुंदर शिंदे यांच्यावर नाव घेऊन उघड टीका केली आहे.
नांदेड जिल्हा हा तसा राज्य आणि केंद्रीय राजकारणाच्या सतत केंद्रस्थानी राहिलेला आहे. आता काल शनिवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानेही नांदेड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी भाजपला मतदान केल्याची जाहीर टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे. वास्तविक शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झालेले आमदार शामसुंदर शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील महाविकास आघाडीला आपला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांनी विशेष जवळीक साधलेली आहे.
पण शनिवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार संजय पवार यांना मतदान न करता भाजपाचे धनंजय महाडिक यांना मांडताना केल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे. संजय पवार यांच्या पराभवाबाबत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. राऊत यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्यावर नाव घेऊन उघड टीका केली आहे.
हायव्होल्टेज ड्राम्यानंतर आज रविवारी पहाटे राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांचा निकाल हाती आला. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची थेट नावं जाहीर केली. यावेळी त्यांनी मते न देणाऱ्या व फुटलेल्या अपक्षांची यादीच वाचून दाखवली. यात लोहा- कंधारचे आमदार शामसुंदर शिंदे यांचेही नाव त्यांनी घेतले.
यावेळी बोलताना खा. राऊत म्हणाले की, आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. पण जी, सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्हाला शब्द देऊन या लोकांनी आमच्याशी दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे. यात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. त्याचबरोबर लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, अशी उघड उघड टीका खा. संजय राऊत यांनी केली. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे, ज्या लोकांनी शब्द दिला ते शब्द पाळतील पण त्यांनी ते पाळले नाहीत, असेही ते म्हणाले.
आ. शिंदे स्थानिक पातळीवर खा. चिखलीकर आणि भाजपविरोधात
लोहा- कंधारचे आ. शामसुंदर शिंदे हे स्थानिक पातळीवर भाजप आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात आहे. भाजप खासदार चिखलीकर हे तर त्यांचे सख्खे मेव्हणे आहेत. पण आ. शिंदे विरुद्ध खा. चिखलीकर असा राजकीय संघर्ष येथे सतत पाहावयास मिळत असतो, हे इथे उल्लेखनीय!
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻