ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुखेड (जि. नांदेड)- मुखेड तालुक्यात वादळी- वारे आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला आहे. यात केरुर गावातील तरुण शेतकरी ठार झाला असून अनेक जनावरे दगावली आहेत. ही घटना काल रविवारी घडली असून आज सकाळी ती उघडकीस आली.
तालुक्यातील केरुरजवळ भगनुवाडी गट क्र. २२७ च्या शेतातील शिवारात वीज पडुन तरुण शेतकरी ठार झाला तर खैरका गावातील जनावरे मृत्यूमुखी पडले. शेतात जागलीवर गेलेल्या या शेतकऱ्यावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
मुखेड तालुक्यातील केरुर येथील शेतकरी बालाजी तेजेराव शिंदे (वय ४०) हे आपल्या भगनुरवाडीच्या गट क्र. २२७ च्या शेतातील शिवारात जागलीसाठी गेले होते. अचानक रात्री वाऱ्यासह काही क्षणातच विजांच्या कडकडाटासह धो- धो पाऊस सुरू झाला. पाऊस मोठा असल्याने पावसापासून बचाव करण्याच्या तयारीत असलेल्या बालाजी तेजेराव शिंदे (वय ४०) यांच्या वर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळी.१० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर तहसीलदार व पोलीस निरिक्षकांना या घटनेची माहिती देण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांमार्फत घटनास्थळी जाऊन पंचानामा केला. बालाजी तेजेराव शिंदे यांचा मृतदेह मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून, उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
दुसऱ्या एका घटनेत खैरका गावच्या शिवारात शंकर मोतीराम सुर्यवंशी यांच्या चार म्हशी ठार झाल्याची घटना घडली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻