ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – काल रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले होते. त्यानंतर उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये येत आहेत.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दिनांक 7 मे रोजी नांदेडमध्ये येत आहेत. तेलंगणातील प्रचाराच्या निमित्ताने या निवडणूक काळात ते तिसऱ्यांदा नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी सात वाजता शिर्डी विमानतळावरून नांदेड विमानतळावर येणार असून नांदेड विमानतळावरून ते दिल्ली किंवा तेलंगणाकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यात अति महत्त्वाची व्यक्ती येत असल्याने ड्रोन किंवा ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात उडविण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड विमानतळावर येत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
खा. राहूल गांधी यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत
काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहूल गांधी हे तेलंगणा दौऱ्यावर जाण्यासाठी काल रविवारी नांदेड विमानतळावर आले होते. जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान नांदेड लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपलाच विजय होईल, असे काँग्रेस महविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी खा. राहूल गांधी यांच्यापुढे विश्वास व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यावेळी नांदेड लोकसभा विजयासाठी खा. राहूल गांधी यांनी शुभेच्छा दिल्याचेही सांगण्यात आले. नांदेडहून तेलंगणा येथील निर्मलच्या नियोजित प्रचार सभेला खा. राहुल गांधी रवाना झाले.
काल रविवारी राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण, आ. मोहनराव हंबर्डे, दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, ज्येष्ठ नेते इश्वरराव भोसीकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, अनिल मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर सोंडारे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण, आदीसह इतर पदाधिकाऱ्यांनी खा. राहूल गांधी यांचे स्वागत केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻