ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर- डॉ. रमेश भराटे यांची आयएमएच्या वैद्यकिय शिक्षण व संशोधन कमीटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आय एम ए महाराष्ट्रची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली असुन अध्यक्षपदी डॅा. सुहास पिंगळे तर सचिवपदी डॅा मंगेश पाटे यांची निवड करण्यात आली आहे. सध्या पदवीपुर्व व पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण घेणारा विद्यार्थी कुठल्यान कुठल्या अडचणींना सामोरे जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणुन आयएमए महाराष्ट्र यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषद ही नवीन कार्यकारीणी केली असून या कार्यकारीणीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी लातुर येथील प्रसिद्ध श्वसनविकार तज्ञ व आयएमए लातुर चे माजी अध्यक्ष डॅा.रमेश भराटे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली आहे.
एम बी बी एस, एम डी व सुपरस्पेशालिटी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, फीस ची रचना, शैक्षणिक मुल्यांकन ईत्यादी बाबींवर ही कमिटी कार्य करणार आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या मोहीमेमध्ये जोडले जाणार आहे. डॅा भराटे यांनी या पुर्वी पण आयएमएएएमएस उपाध्यक्ष, स्पोटर्स कमिटी, लिगल कमीटी यावर कार्य केले आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल आय एम ए चे राज्यअध्यक्ष डॅा सुहास पिंगळे, डॅा मंगेश पाटे, डॅा रवींद्र कुटे, डॅा रामकृष्ण लोंढे, डॅा ऊत्तुरे, डॅा पाचणेकर, आय एम लातुर चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. डॅा भराटे हे इंडियन चेस्ट सोसायटी महाराष्ट्र चे प्रभारी असुन लवकरच लातुर येथे परिषद घेण्यात येणार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻