ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ लोहा- नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे भूमिपुत्र गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ते सध्या लातूर येथे स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) मध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. नांदेडचे सुपुत्र झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झालेले आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणारे संजय लाठकर यांना आधी राष्ट्रपती शौर्य पदक आणि आता दुसऱ्यांदा उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदकाचा सन्मान मिळत आहे.
गजानन भातलवंडे यांना यापूर्वी राज्य सरकारच्यावतीने नक्षलवादी भागात केलेल्या कार्याबद्दल तसेच इतर उत्कृष्ट कामगिरीबद्दल तीन पदके आणि प्रशस्ती पत्र, आवार्ड मिळाले आहेत. नांदेड, परभणी, बीड येथील त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट अशी राहिली आहे. भाषा प्रभुत्व, कार्य प्रणाली, प्रामाणिकपणा, कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक तसेच त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे ते नेमणुकीच्या ठिकाणी सर्वप्रिय असतात.
त्यांचे लहान बंधू पांडुरंग भातलवंडे नांदेड येथे एलआयसी मध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर तर धाकटे बंधू मनोज हे परभणी येथे माध्यमिक पे-युनिट मध्ये अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻