ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी लातूरमध्ये करण्यात आली आहे. या पुतळ्याला ‘स्टॅचू ऑफ नॉलेज’ असे नाव देण्यात आल आहे. भाजप खा. सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून आंबेडकरी अनुयायांनी साकारलेल्या या पुतळ्याचे अनावरण जयंतीच्या पूर्व संध्येला उद्या १३ एप्रिल रोजी होणार आहे. भाजप नेते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानात या भव्य ७० फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. लातूरचे भाजप खा. सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून तसेच आंबेडकरी अनुयायांच्या सहकार्यातून हा भव्य पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. २५ दिवसांपूर्वी या पुतळा उभारणीचे काम सुरु झाले. फायबर, प्लास्टिक, पीओपी आणि स्टीलचा वापर करून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. कारागिरांनी दिवस-रात्र मेहनत करून या भव्य पुतळ्याचे काम दोन दिवस आधीच पूर्ण केल आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘संविधान’ हातात घेऊन खुर्चीत बसलेली अत्यंत सुंदर आणि भव्य अशी ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
‘स्टॅचू ऑफ नॉलेज’ या ७० फूट उंचीच्या भव्य प्रतिकृतीचं अनावरण माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात येणार असून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी या भव्य प्रतिकृतीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे आणि त्यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांनी दिली आहे.
दि? १३ एप्रिल रोजी सायं. ०६ वा. होणाऱ्या अनावरण कार्यक्रमास आंबेडकरी अनुयायांनी, नागरिकांनी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻