ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लोहा- तालुक्यातील सात ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त झालेल्या सात सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयी आनंद साजरा केला.
लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्यांचे निधन, राजीनामा व इतर कारणास्तव रिक्त झालेल्या सात जागेच्या पोटनिवडणुकी साठी दि. 21 रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामध्ये किवळा, गोलेगाव (प क), कलंबर (खु), शेवडी (बा), दापशेड, ढाकणी, कदमाची वाडी आदी सात ग्रामपंचायतींचा समावेश होता.
दि. 22 रोजी सदरील सात ग्रा. पं. च्या सात जागांचाचा निकाल लोहा तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. त्यामध्ये गावनिहाय विजयी उमेदवार असे–
- किवळा (प्रभाग क्र.3) – सीमा व्यंकटी टर्के (सर्वसाधारण स्त्री),
- गोलेगाव (पक) (प्रभाग क्र. 2) – रंजना विश्वंभर किरतवाड (सर्वसाधारण),
- कलंबर (खु) (प्रभाग क्र. 3) – भाग्यश्री माधव घोरबांड (सर्वसाधारण स्त्री),
- शेवडी (बा) (प्रभाग क्र. 1) – हुसेन हिराशा शेख (सर्वसाधारण),
- दापशेड (प्रभाग क्र. 1) – गंगाधर आनंदा सोनकांबळे (अ.जा.),
- ढाकणी (प्रभाग क्र. 3) – उत्तम संभा गजभारे (अ.जा.),
- कदमाचीवाडी (प्रभाग क्र. 2) – बाबुराव आबाजी कदम (सर्वसाधारण)
वरीलप्रमाणे निवडीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. निवडणुक आणि मतमोजणी शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय भोसीकर, अव्वल कारकून प्रमोद बडवने, धुळगुंडे, सुर्यकांत पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻