ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ सोशल माध्यमावर बनावट आयडीचा केला वापर
◆ नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड– विद्यार्थ्याने विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनाही अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठविल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी नांदेडच्या पॉलिटेक्निक कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन एकास अटक करण्यात आली आहे. सोशल माध्यमावर बनावट आयडीचा केला वापर करून हा प्रकार करण्यात आला.
शहराच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ऑनलाइन क्लास सुरू असताना स्वतःची ओळख लपवून अन्य व्यक्तीच्या बनावट आयडीवरून विद्यार्थिनी, शिक्षिका यांच्यासह शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही अश्लील संदेश व व्हिडिओ पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी यातील एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
विष्णुपुरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका शाखेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी गुगल मीट किंवा झूमद्वारे ऑनलाईन क्लास सुरू असताना एक डिसेंबर २०२१ ते १० एप्रिल २०२२ दरम्यान आपली स्वतःची ओळख लपवून महाविद्यालयांमधील सिस्टम जनरेटेड करून वेगवेगळ्या कंपन्यांचे संदेश, अश्लील शिवीगाळ, फोटो व व्हिडीओ व्हाट्सअपवरून सिस्टम जनरेटेड इंटरनॅशनल क्रमांकावरून महाविद्यालयांमधील अनेक शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनीना पाठवले. हा प्रकार काही दिवसांनी उघडकीस आल्यानंतर या महाविद्यालयातील एका शिक्षकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी यातील एका आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻