ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे एसआयटीचे प्रमुख
◆ पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक
गोळीबार आणि हत्येचा व्हिडिओ 👇🏻
नांदेड- व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड करण्यात येत आहे. काल रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत तब्बल 45 संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हे या समितीचे प्रमुख असणार आहेत.
नांदेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (एसआयटी)ची स्थापना केली आहे. या समितीचे प्रमुख अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे असून नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या समितीमध्ये नेमण्यात आले आहेत. ही समिती लवकरच आपला अहवाल वरिष्ठांना सादर करील व आरोपींच्या मुसक्या आवळतील असा विश्वास प्रमोदकुमार शेवाळे यांनी व्यक्त केला.
संबंधित बातमी 👇🏻
पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक, तपासाच्या सूचना
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संजय बियाणी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर, ते थेट जिल्हाधिकारी करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. कुठल्याही परिस्थितीत आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते.
संजय बियाणी हत्येची घटना मराठवाड्यातील लोकांची चिंता वाढविणारी- ना. अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया
संजय बियाणी यांची पिस्तूलधारी दोन अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हत्या केली ही घटना मराठवाड्यातील लोकांची चिंता वाढविणारी आहे. परंतु या घटनेतील गुन्हेगारांना लवकरच जेरबंद करण्यात येईल यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय बियाणी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण बुधवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी नांदेडला पोहचताच संजय बियाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर अंत्यविधीला उपस्थित राहिलो. परत त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेसंदर्भात संजय बियाणी यांच्या कुटुंबियांनी मनमोकळेपणाने पोलिसांना गोपनीय माहिती सांगावी. या घटनेचा तपास योग्य दिशेने गेला पाहिजे, विशेष करून तातडीने गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि या हत्येमागे नेमका सूत्रधार कोण आहे याचा शोध लावण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. हत्येचे नेमके कारण आणि हत्ये मागे सूत्रधार कोण या दोन प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी शोधून काढावे आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असा तपास करावा अशा सूचना अशोक चव्हाण यांनी दिल्या.
नांदेडकरांना अशा पद्धतीच्या काही धमकीवजा फोन आले तर नक्कीच मनमोकळेपणाने पोलीस अधीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक किंवा माझ्याशी थेट संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहनही चव्हाण यांनी केले. नांदेडची कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी सक्षम कारवाई करावी. नागरिकांना सुरक्षिततेचे भावना निर्माण व्हावी असे पोलीस यंत्रणांनी काम करावे. संजय बियाणी यांच्या दुर्दैवी हत्येमागे नेमके कोण आहेत त्यांना शोधून काढणे पोलिसांपुढे आव्हान आहे. या घटनेमुळे नांदेड शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे गुरुवारी दि. सात एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन हा घटनाक्रम त्यांना सांगणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या सर्व तपाससाची जबाबदारी एसआयटीचे प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यावर टाकली असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांच्या अभिलेखावरील 45 अग्निशस्त्रधारक गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू आहे. नांदेड शहरातील काही व्यक्तींच्या सुरक्षा काढणे व देणे हे आमच्या हाती नसून त्यासाठी जिल्हा स्तरावर समिती असते. त्यानुसार सुरक्षा पुरविल्या जातात. जून 2020 मध्ये स्वतः संजय बियाणी यांना सुरक्षा पाहिजे का असे विचारले असता त्यांनी नकार दिला असल्याचे निसार तांबोळी यांनी सांगितले. या प्रकरणात नक्कीच लवकरच गुन्हेगार आम्ही नांदेडकरांसमोर हजर करू असा विश्वास निसार तांबोळी यांनी व्यक्त केला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻