ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नाशिक- नांदेडसह मराठवाड्यातील परभणी, बीड (अंबाजोगाई), लातूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेले पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांची नाशिक (ग्रामीण) च्या जिल्हा पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काल दि.२१ ऑक्टोबर रोजी काढण्यात आले. त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्विकारला.
गृहविभागाने राज्यातील ४५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, यात २५ अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या. यात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काल दि.२१ अॉक्टोबर रोजी काढण्यात आले. मुंबईत पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत शहाजी उमाप यांना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश शासनाकडून निर्गमित या आदेशात करण्यात आले होते. त्यानुसार काल त्यांनी पदभार स्विकारला.
मुंबईत पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना उल्लेखनीय सेवेबद्दल उमाप यांना २०१९ मध्ये राष्ट्पती पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी नांदेड आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, मुंबई येथे सेवा बजावली आहे. २०१२ मध्ये ते नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता, यात एक हजाराहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻