ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
नांदेड– शहराच्या शारदानगर भागात एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना आज बुधवार, दिनांक ५ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक संजय ननवरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
विशाल रमेश धुमाळ (वय 23) रा. शनी पार्डी, ता. अर्धापुर नांदेड हा रामनगर, तलाठी गल्लीमध्ये खाजगी नोकरी (फायनान्स कंपनीत) करत होता. तो राज रेसिडेन्सी पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मयत झाला. बाहेर कोणीतरी अज्ञाताने त्याच्यावर खंजरने सपासप वार केल्याने तो आकांताने पळत सुटला, आणि या ठिकाणी शिरला आणि कोसळून गतप्राण झाला. नेमका त्याचा खून कोणी आणि कशामुळे केला हे तपासाअंतीच निष्पन्न होणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻