ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
सहस्रकुंड/ नांदेड- इस्लापूर (सहस्रकुंड) येथील शाळेत जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी अखेर या शाळेतील नऊ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील इस्लापूर (सहस्रकुंड) येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारी झाले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी चक्क शाळेतील दोन दुचाकी पेटविल्या. याप्रकरणी प्राचार्य यांच्या फिर्यादीवरून नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये रविवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यात संतप्त विद्यार्थ्यांनी शाळेत आलेल्या अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांनाही मारहाण केली. विशेष म्हणजे प्राचार्य अरुण मसलकर यांनाही धक्काबुक्की करून दहशत निर्माण करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केले.
या धक्कादायक प्रकरणी प्राचार्य अरुण मसलकर यांच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात नऊ विद्यार्थ्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, हाणामारी, दहशत निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी. पी. सावंत करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻