ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- एसबीआय बँकेचे युनो ॲप डाउनलोड करण्यास सांगून एका हॅकरने कंधार येथील एका शिक्षकाला तब्बल आठ लाख 88 हजार 398 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. एवढी रक्कम फक्त त्याने टप्प्याटप्प्याने चार तासात बँक खात्यातून काढून घेतली.
मुखेड येथील विरभद्र शिवशंकर बुलेरे हे कंधार येथील मनोविकास विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 21 मार्च रोजी दुपारी एक वाजता एसबीआय हेल्पलाइनवरून बोलतो असे सांगून युनो ॲप डाऊनलोड करण्यासाठी कॉल आला आणि बँक डिटेल्स भरण्यास सांगितले. यासाठी दहा रुपये चार्ज भरावा लागेल असेही सांगण्यात आले. शिक्षकाने AnyDesk एनीडेस्कवर आपला बँक प्रोफाईल डिटेल टाकताच त्यांच्या खात्यातून एक ते चारच्या दरम्यान हॅकरने टप्प्याटप्प्याने आठ लाख 88 हजार 398 रुपये ऑनलाइन परस्पर काढून घेतले.
हा प्रकार लक्षात येताच शिक्षक वीरभद्र बुलेरे यांनी लगेच कंधार पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात हॅकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लोणीकर करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻