ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची कुलगुरुंकडे मागणी
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने दिले निवेदन; निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा
नांदेड– सध्या बहुतांश अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने शिकवला जात आहे. तर मग परीक्षा या ऑफलाइन कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. तसेच कालच नांदेड जिल्ह्यामध्ये ओमायक्रोन विषाणू संक्रमित झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विद्यार्थी हा पुन्हा जास्त भयभीत झालेला दिसून येतो. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीमध्ये सर्व सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात यावा, अन्यथा 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी सोमवार दि.२८ डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांची शिष्टमंडळासोबत भेट घेऊन निवेदन सादर केले. सध्याची कोरोना (ओमायक्रोन) सदृश्य संभाव्य परिस्थिती पाहता विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आरोग्याच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय बदलावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, मोहम्मद दानिश, रोहित पवार, कपिल मस्के, मोहम्मद सोहेल, लखन सोनसळे रोहन महाबळे, रवि साळवे, रुद्रा गंगासागर, सुशील जोंधळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻