Friday, November 22, 2024

शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून लपण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर; बंडखोर आमदारांचे फोटो काढताना चेहराही लपविण्याचा प्रयत्न – पहा व्हिडिओ 👇🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

सुरतमधील हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांचे फोटो काढतानाचा व्हिडिओ

नांदेड– आमदार बालाजी कल्याणकर यांचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत ते लपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सुरतमधील हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांचे फोटो काढताना आ. कल्याणकर यांच्याकडून चेहरा लपविण्याचा प्रयत्न असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडालेली आहे. यातच नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकरही नॉट रिचेबल झाले आहे, त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात चर्चांना उधाण आले होते. आमदार बालाजी कल्याणकर यांचा मोबाईल सोमवारी रात्रीपासून स्विच ऑफ होता.

संबंधित बातमी 1 👇🏻

पण, आ. कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ते आधी सुरत येथे आणि त्यानंतर गुवाहाटी येथे असल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान आमदार बालाजी कल्याणकर यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सुरतमधील हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांचे फोटो काढताना ते लपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आ. कल्याणकर यांच्याकडून चेहरा लपविण्याचा प्रयत्न असल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे. शेजारच्या आमदारांनी नीट उभे राहा असे सांगितल्यानंतर ते पुढे आल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे.

संबंधित बातमी 2 👇🏻

विधान परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देत आपला अतिरिक्त उमेदवार निवडून आणला. शिवसेनेचीही मतं फोडत भाजपचे पाच उमेदवार विजय झाल्याने शिवसेनेला हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा असणारे शिवसेना नेते तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेच्या अनेक आमदारांना सोबत घेत गुजरातमधील सुरत गाठले. सुरतमधून आता ते आसाममध्ये गुवाहाटीत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.

नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भव्य असा कार्यक्रम घेतला होता. असे असताना आमदार कल्याणकर हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे वृत्त आल्यानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात असून चर्चांना उधाण आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!