ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नवी दिल्ली- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक हादरा बसला असून 19 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत वेगळा गट स्थापन केला आहे. यात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचाही समावेश आहे. या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपला हा निर्णय जाहीर केला.
शिवसेनेत उभी पडल्यानंतर पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यात १) आम्हीच अधिकृत शिवसेना असून आमच्याकडे संसदीय बहुमत आहे. २) त्यामुळे लोकसभेत वेगळा गट म्हणून आम्हाला मान्यता मिळावी. ३) भावना गवळी याच शिवसेनेच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) असतील. पत्र दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदारांनी, बहुमताचा कल पाहून लोकसभा अध्यक्ष याच गटाला मान्यता देतील व त्यांची आसन व्यवस्था (डिव्हीजन क्रमांक) या आठवड्यातच बदलेलं असा विश्वास व्यक्त केला आहे.
संबंधित बातमी 👇🏻
या 12 खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आज १२ खासदारांनी महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेत आपल्याला पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आज शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ खासदारांचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांकडे दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.
१२ खासदारांची बैठक संपल्यानंतर महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि १२ खासदार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे गटनेता म्हणून आणि खासदार भावना गवळी यांचे मुख्य प्रतोद म्हणून नाव जाहीर केले. हे १२ खासदार २० ते २२ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. या सर्व खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे, त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. या सर्वांनी आज लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देखील दिले आहे, असे शिंदे म्हणाले.
खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांच्या नावाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील ५० आमदारांनी भाजपसोबत जाण्याची जी भूमिका घेतली तीच भूमिका या १२ खासदारांनी घेतली आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्याला खासदारांनी साथ दिली आहे. शिवसेना आणि भाजप यांची निवडणूक पूर्व युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारला पूर्ण सहकार्य देऊ केले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र आले तर विकास चांगला होऊ शकतो, असे या खासदारांना वाटत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
12 खासदारांची नावं
प्रताप जाधव
सदाशिव लोखंडे
राहुल शेवाळे
भावना गवळी
हेमंत पाटील
संजय मंडलिक
कृपाल तुमाणे
श्रीरंग बारणे
धैर्यशील माने
श्रीकांत शिंदे
राजेंद्र गावित
हेमंत गोडसे
उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले 7 खासदार
विनायक राऊत
अरविंद सावंत
गजानन किर्तीकर
ओमराजे निंबाळकर
संजय जाधव
राजन विचारे
कलाबेन डेलकर
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻