ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- 23 डिसेंबर हा भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस. हा दिवस भारतभरात राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता म्हणून नांदेड जिल्ह्याच्या मारतळा येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष एका शेतात जाऊन शेतकऱ्याचा सत्कार केला.
मुलांना शेतकरी व शेती याबद्दल कृतज्ञता असावी. श्रम करण्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा शाळेतील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी वर्ग पाचवी ते सातवीच्या सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतात नेले. मारतळा येथील शेतकरी गोविंद बीचेवाड यांचा शेतात जाऊन पुष्पहार घालून सत्कार केला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा कसा आहे, देशाच्या विकासात शेतकऱ्यांचे कसे खूप मोठे योगदान आहे, याबद्दल सविस्तर माहिती उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी शेतकरी गोविंद बीचेवाड यांनी शेतकऱ्यांचा दिनक्रम सर्व मुलांना सांगितला. व आपल्या शेतातील बोरं मुलांना खाण्यासाठी दिली तसेच सत्कार केल्याबद्दल सर्व मुलांचे व शाळेचे आभार व्यक्त केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट मुगावे, प्रल्हाद पवार उपक्रमशील शिक्षक रवी ढगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻