ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– नेहमीप्रमाणे यावर्षीही नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात आले आहे. आज कृषी विभागाने कारवाई करीत शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे.
शहरातील अर्धापुर रोडवरील एका गोदामात सोयाबीन, उडीद, हरभरा या बियाणांची अवैधरित्या बियाणे पॅकिंग कंपनीवर कृषी विभागाने धाडसत्र करत शेकडो क्विंटल बोगस बियाणे हस्तगत केले. कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धडक कार्यवाही करत ह्या बोगस बियाणे कंपनीचा कृषी विभागाने भांडाफोड केला. ज्यात सदर बोगस बियाणे कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा यांची बोगस बियाणांची पॅकेजिंग करण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कृषी विभागास दिल्या नंतर कृषी अधिकारी अनिल शिरपुरे व नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड टाकत हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणला.
ज्यात प्रथम दर्शनी सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणाची बोगस पध्दतीने बियाणे तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. सदर कंपनी ही मयुरी सिड्स, बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स या नावाने बोगस बियाणे कंपनी चालत असल्याचे निदर्शनास आलं. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड , बँगवरील ठिकाण, लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या बोगस कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत. तर सदर गोदामात सोयाबीन 100 किवंटल हरभरा, 20 किवंटल उडीद, 100 किवंटल पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन व काम करणारे 20 कामगार आढळून आले आहेत. सदर गोदाम कृषी विभाग व पोलिस प्रशासन यांच्या वतीने सील करण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻