ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर- श्री केशवराज माध्यमिक विद्यालय,लातूर येथे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त भारतीय गणितज्ञांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
जवळपास २२ भारतीय गणितज्ञांची माहिती प्रत्येक वर्ग,तुकडीतील एक याप्रमाणे विद्यार्थ्याने लिहिली.श्रीनिवास रामानुजन,आर्यभट्ट, भास्कराचार्य, आर्यभट्ट द्वितीय, पीसी महालनोबिस,नारायण पंडित, शकुंतला देवी, नीलकंठ सोमयाजी आदी गणितज्ञांची सविस्तर माहिती या हस्तलिखितात लिहिण्यात आली. प्रारंभी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर,पर्यवेक्षक दिलीपराव चव्हाण, पर्यवेक्षिका सौ.अंजली निर्मळे, गणित विषय प्रमुख धनंजय कुलकर्णी, गणित शिक्षक सौ.कांचन तोडकर ,शैलेश सुपलकर, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब करपुडे यांच्या हस्ते झाले. विद्यालयातील सर्व गणित विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी विद्यालयातील गणित विषय शिक्षक बालासाहेब करपुडे यंनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन परिचयावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय गणित विषय प्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻