ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आज सायंकाळी नांदेड शहरात आगमन झाले. वाजेगाव, देगलूर नाका परिसरातून नांदेड शहरात आलेल्या यात्रेचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.
दरम्यान, शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किती त्रास झाला असेल, वेदना होतात, सत्य जे ते बाहेर यायला पाहिजे. सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसावी. संजय राऊत यांच्यासारखाच न्याय अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मिळावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड येथे गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रेमाचे संबंध, जुनी नाती आहेत, अशोक चव्हाण यांच्यासोबत काम केले आहे. सर्वसामान्य माय- बाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळते, मी कोणालाही संदेश देण्यासाठी आली नाही, मी तेवढी मोठी नाही. सीआयसी नोटबंदीची चर्चा, काळा पैसा आणला तर स्वागत आहे. परंतु ते पैसे आणले का, सीआयसीबद्दल वर्तमान पत्रामध्ये आले की, नोटबंदी झाली मग एवढ्या नोटा आल्या कुठून, छापल्या कुठे, वितरण हे माझ्या सारख्या व्यक्तीला प्रश्न पडतो, बेरोजगारी प्रचंड वाढले, तेलाचे भाव कुठे जात आहे. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई ही मोठी आव्हाणे उभी आहेत, समाज म्हणून त्यावर चर्चा केली पाहिजे. राज्याचे अधिवेशन बोलवा, त्यात चर्चा करा चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले, कोणत्याही राज्यात जावो, तो विषय नाही, पण मेरीटवर महाराष्ट्र असताना असे का झाले, चांगल्या दर्जाचे शिक्षण, सुरक्षितता महाराष्ट्र मध्ये आहे. त्यामुळे देशभरातील नेत्यांची मुले राज्यात येतात, चांगले वातावरण असताना, अरुण जेटली म्हणायचे राज्य आणि केंद्राचे प्रेमाचे संबंध असले पाहिजे, परंतु ते आता होताना दिसत नाही. अजित पवार मागील आठ दिवसापासून नोट रीचेबल असल्याच्या बातम्या येत असल्याचे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सकाळी सात वाजल्यापासून सतत काम करणारे नेते काही वेळ कुटुंबासमवेत घालत असतील तर त्यांनी घालू नये का असा प्रतिसवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिक्षक आमदार विक्रम काळे हे सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित सभेसही या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी खा. राहुल गांधी यांना खास घोंगडी, काठी आणि विठ्ठल रुखमाईची मूर्ती भेट देऊन सत्कार केला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻