ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ मुंबई- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे. दुसऱ्यांदा कोरोनाबाधित झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. ट्विटर, फेसबुक अशा सोशल मीडियाद्वारे त्यांनी हे आवाहन केले आहे.
अशोक चव्हाण हे कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट येताच तात्काळ राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून ते बाहेर पडले. काल भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. तसेच इतरही विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर आज ते मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. त्यामुळे नांदेड आणि मुंबईत ते अनेक मंत्री, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह इतरही अनेकांशी मोठ्या प्रमाणात संपर्कात आलेले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन अशोक चव्हाण यांनी कोरोनाबाधित झाल्याची माहिती देत, संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻