ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांची उपस्थिती
नांदेड– इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गाडीपुरा परिसरात हिंदू, मुस्लिम व अन्य धर्मीय मोठ्या संख्येने राहतात. या परिसरात मागील काही ववर्षांपासून जातीय दंगली घडत असल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचण्यासाठी अवधी लागत होता. या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी डॉ. विपिन, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गाडीपुरा भागात नव्याने पोलीस चौकी उभारावयाच्या जागेची पाहणी केली. बडी दर्गा ते गाडीपुरा धोबी गल्ली परिसरात ही चौकी उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नुकतीच या ठिकाणी किरकोळ कारणावरून हिंदू- मुस्लीम दंगल उसळली होती. यातील गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडले नसून फरार आहेत. या भागात हिंदू आणि मुस्लिम तसेच अन्यधर्मीय मोठ्या संख्येने राहतात दाट वस्तीचा हा परिसर असल्याने ये- जा करण्यासाठी रस्तेही अरुंद आहेत. विशेष मध्ये मोठे वाहन या रस्त्यावरून ये- जा करू शकत नाही. याचा फायदा काही समाजकंटक घेऊन या परिसरात दंगली सारखी परिस्थिती निर्माण करतात अशा समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी व पोलिसांची मदत तातडीने मिळण्यासाठी या परिसरात नव्याने पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन, पोलीस अधीक्षक शेवाळे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, उपायुक्त अजितपालसिंग संधू, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, उपमहापौर अब्दुल गफार यांनी स्थळाची पाहणी केली. जागा ठरल्यानंतर लवकरच या ठिकाणी पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात येईल असे पोलीस अधिक्षकांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻