ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- कोरोमंडल सिमेंटच्या नावाखाली हिंगोलीच्या एका व्यापाऱ्याला बनावट अकाउंट नंबर पाठवून सात लाख 80 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा औद्योगिक वसाहतीत सिमेंट व्यापारी प्रवीण शामराव हेडाऊ (वय ५०) यांना तीन आरोपींनी संगणमत करून कोरोमंडल सिमेंट पाठवण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कोरोमंडल सिमेंटचे बनावट इन्व्हाईस बिल पाठविले. आणि कोरोमंडल सिमेंटच्या नावे बनावट अकाउंट नंबर पाठवून कोरोमंडल सिमेंटच्या तीन हजार बॅग पाठवितो म्हणून ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून सात लाख ८० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले.
व्यापारी प्रवीण हेडाऊ यांनी नांदेडच्या महावीर चौक परिसरातील लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेतून सात लाख ८० हजार रुपये संबंधित अकाउंट नंबरवर पाठवून दिले. परंतु सिमेंटही नाही आणि नंतर संबंधितांचा फोनही लागत नव्हता. हा प्रकार दहा ऑक्टोबर २०२२ रोजी घडला होता. याबाबत हेडाऊ यांनी बरेच दिवस याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रकरणात प्रवीण हेडाऊ यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻