ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- कंधार येथील तीन तरुण पोहण्यासाठी मन्याड नदीवर गेले असता दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. 22 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास कंधारपासून काही अंतरावर असलेल्या मन्याड नदीपात्रात घडली.
सुट्टी असल्याने पोहायला गेलेल्या कंधार येथील दोघांवर काळाने घाला घातला आहे. कंधार येथील लॉ कॉलेज परिसरात राहणारा सौरभ सतीश लोखंडे (वय 16) आणि ओम राजू काजळेकर (वय 15) गवंडीपुरा कंधार व बालाजी डांगे राहणार रंगारगल्ली कंधार हे तिघेजण दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील पाटील लुंगारे यांच्या शेतात शेजारी असलेल्या मन्याड नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना सौरभ लोखंडे आणि ओम काजळेकर यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. हा प्रकार सोबतचा मित्र असलेला बालाजी डांगे यांच्या लक्षात येताच तो धावत पळत ओरडत घरी आला आणि घडलेला प्रकार त्याच्या घरच्यांना सांगितला. यानंतर परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली तोपर्यंत हे दोन्ही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.
ही घटना समजताच पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. रात्री शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुळे कंधार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻