Thursday, November 21, 2024

सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या छोट्या सर्वेशला राहुल गांधींनी दिला कॉम्प्युटर भेट

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणे या शालेय विद्यार्थ्याला परिस्थितीमुळे कॉम्प्युटर सुध्दा पाहता आला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी आज या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर भेट दिला.

भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. पण त्याचवेळी आपण आजपर्यंत संगणक पाहिला नाही व आपल्या शाळेतही संगणक नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधी यांनी या मुलाला नवा संगणक भेट दिला आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला संगणक भेट दिला. त्यामुळे एकप्रकारे या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले आहे.

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.

पण ही एका मुलाची गोष्ट झाली, देशातील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक मुलाने  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!