ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
■ २५ व २६ फेब्रुवारी रोजीचे पेपर पुढे ढकलले
नांदेड– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. दि.२६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२१ ही परीक्षा असल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेत बदल करण्यात आलेला आहे.
विद्यापीठाच्या दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन दिवसाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही दिवसाचे पेपर त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्यानंतरच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी घेण्यात येतील. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻