ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अखेर पुन्हा शिवसेना – भाजप महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे.
शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. तसेच शिवसेनेकडे असलेली हिंगोली लोकसभेची ही जागा भाजप स्वतःकडे घेईल अशी शक्यता ही वर्तविण्यात येत होती. मात्र त्या सर्व शंकांना फोल ठरवत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी पुन्हा उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना ठाकरे गटाने हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत एकनाथ शिंदे यांनी 8 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. यात हिंगोलीसह दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत.
भापजने त्यांच्या 23 जागांवर उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांनी 8 जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
• शिवसेनेकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर
दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻