ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
व्हिडिओ 👇🏻
नांदेड- रुग्णालयातील औषध विक्रेते दुकानात काम करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा खुर्चीवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक नांदेडमध्ये घडली आहे. ही घटनानांदेडच्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये घडली असून ही घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली आहे.
औषधी दुकानचालक पवन तापडिया (वय 42) यांचे सोमवार दि.३ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे पवन तापडिया आपल्या औषधी दुकानात बसले होते, काम सुरू असतानाच बसल्या बसल्याच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. वरच्याच मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये त्यांना घेऊन जाण्याची संधीही काळाने दिली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सर्वांसाठीच चटका देणारी ठरली आहे.
नांदेड शहराच्या डॉक्टर लेन परिसरात गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये पवन हरीप्रसाद तापडिया यांचे मेडिकल आहे. ते सध्या जुना कौठा भागात वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी ते घरून मेडिकलवर आले. पहिला मजला पायी चढून आपल्या दुकानात जाऊन बसले. कॉम्पुटर चालू करून ते काम करू लागले. यावेळी त्यांच्या शेजारी त्यांचा सहकारी बसलेला होता. काम सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि खुर्चीवर बसूनच ते खाली कोसळले.
शेजारी बसलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना उचलले आणि मेडिकलच्या वरील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात त्यांना दाखल केले. आयसीयूमध्ये उपस्थित सर्व डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याने डॉक्टरही काहीच करू शकले नाही. पवन तापडिया यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि.४ एप्रिल रोजी नावघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻