ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
कंधार– अखेर ६५ दिवसानंतर कंधार आगारातुन प्रवाशांच्या सेवेसाठी दोन बस पोलीस बंदोबस्तामध्ये कंधार ते नांदेड आणि तीन बस माळेगांव यात्रेसाठी धावत असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या ६५ दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस. टी. बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. खासगी वाहनाने प्रवाशांच्या भाड्यामध्ये दुप्पटीने वाढ करुन प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ पोंहचत होती. त्यामुळे प्रवाशात संताप व्यक्त केला जात होता. विद्यार्थ्याचेही हाल होत आहेत. बाहेरगावच्या विद्यार्थ्याना एस.टी बंद असल्यामुळे बर्याच दिवसापासुन शाळेत जाणे बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लवकर बस सुरु करावी, अशी विद्यार्थ्याकडुन मागणी होत आहे.
कंधार ते नांदेड बस कंधार बसस्थानकातुन ३१ डिसेंबर २०२१ पासून कडक पोलीस बंदोबस्तात दोन बस धावू लागल्या आहेत. यासोबतच तीन बस माळेगांव यात्रेसाठी धावत असल्याने प्रवाशी मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. पहिल्या दिवसाचे उत्पन्न सहा हजार तर दुसर्या दिवसाची दोन बसची चार हजार आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बसमध्ये सुरक्षेसाठी कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस लोहा हद्दीपर्यत, लोहाचे पोलीस सोनखेडपर्यत आणि सोनखेडचे पोलीस नांदेडपर्यत असा पोलीस बंदोबस्तात एस.टी बस सुरु आहे. असे सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻