Thursday, November 21, 2024

01 ते 07 डिसेंबर दरम्यान ‘आझादी का अमृत महोत्सव इंडिया@75’ अभियानांतर्गत ‘पिक विमा सप्ताह मोहिम’

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांनी आझादी का अमृत महोत्सव
इंडिया@75 अभियानांतर्गतप्रधानमंत्री पिक विमा योजनेद्वारे दि. 1 ते 7 डिसेंबर, 2021 या कालावधीत “पिक विमा सप्ताह”
साजरा करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.


त्या अन्वये उपरोक्त कालावधीमध्ये “पिक विमा सप्ताह” आयोजित करुन ज्या जिल्हामध्ये / तालुक्यामधे पिक विमा
योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सहभाग कमी दिसून आला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन त्यांना पिक विमा योजनेमध्ये
सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्याबाबत नियोजन तयार करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले
आहे.


आझादी का अमृत महोत्सव इंडिया@75 अभियानांतर्गत “पिक विमा सप्ताह मोहिम” सर्व राज्यात मोठ्या उत्साहात साजरा
केला जात आहे. यामध्ये खरीप २०२१ हंगामात जुलै महिन्यातील पावसातील खंडा मुळे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती बाबत
अधिसूचना जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करणे. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१
महिन्यामध्ये, अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत जवळपास ३९ लाख सूचना विमा
कंपन्यांना प्राप्त झाल्या असून, सदर सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांना देय होणारी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बाबतची
कार्यवाही विमा कंपन्यांकडून करण्यात येणार आहे.


याचबरोबर रब्बी हंगाम २०२१-२२ मधील गहू, हरभरा सारख्या पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भाग घेण्याचा
अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२१ असा आहे. तर हवामान आधारित फळपीक विमा योजनेत कोकण विभाग वगळून आंबा
पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१, तर डाळींब पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक १४जानेवारी
२०२२ असा आहे. त्यादृष्टीने गावपातळीपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विमा योजनेची
माहिती व महत्त्व पटवून देण्यासाठी सभा, मेळावे, चर्चासत्र, माहिती पत्रकांचे वाटप, पोस्टर्स लावणे, दृकश्राव्य चित्रफिती दाखवणे,
चित्ररथ फिरवणे सारख्या विविध माध्यमातून राज्यात काम करणाऱ्या विमा कंपन्या व कृषी विभाग संयुक्तपणे ही प्रचार प्रसिद्धीची
मोहीम राबवत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!