ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 जानेवारी 2022 रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नांदेड जिल्ह्यात नवीन व्हेरिंएटचा शिरकाव व कोरोना रुग्ण संख्येमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेवून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच अशासकीय संस्था यांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाप्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻