ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
# शहराच्या हडको ते रेल्वे स्थानकादरम्यानची घटना
नांदेड- ऑटोमधून प्रवास करणाऱ्या महिलेची दिशाभूल करून ऑटो चालकाने तिच्याजवळ असलेली दोन लाख 32 हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांची पर्स लंपास केली. ही घटना हडको बसस्टॉप ते हजूर साहिब रेल्वे स्थानक दरम्यान 23 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
औरंगाबाद येथील आरती खंडोजी शेळके (वय २८) ह्या आपल्या लहान मुलांना घेऊन औरंगाबाद येथे जाण्यासाठी हडको येथून ऑटोमधून रेल्वेस्थानक नांदेडकडे येत होत्या. यावेळी हडको बसस्टॉपवरून ऑटोत बसून येत असताना ऑटो चालकाने अन्य प्रवासी घेण्यासाठी त्यांची दिशाभूल करून त्यांच्या जवळ असलेली सोन्या-चांदीचे दागिने व कपडे (पर्स) असा एकूण दोन लाख 32 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला.
हा प्रकार रेल्वे स्थानक परिसरात उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत ऑटोचालक पसार झाला होता. आरती शेळके यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार आनंद बिच्चेवार करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻