ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
काटे यांच्या घरासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी; पोलीसही दाखल
चंद्रकांत खैरे- सुभाष काटे यांच्यात आरोप- प्रत्यारोपांनंतर राडा
खैरे यांच्याकडून गद्दार अशी टीका; तर खैरे विरोधकांशी संधान साधून असतात- काटेंचा पलटवार
लातूर- शिवसेनेचे ९ वर्षे जिल्हाप्रमुख राहिलेले सुभाष काटे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सतत दुटप्पी भूमिका घेत असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत सुभाष काटे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चाकूरमध्ये राडा सुरु झाला आहे. आज काही शिवसैनिकांनी सुभाष काटे यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ येथे एकच गोंधळ उडाला. आता पोलीसही येथे दाखल झाले आहेत.
चाकूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने सुभाष काटे यांचे पुत्र मल्हार काटे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. यावरूनच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रचारात सुभाष काटे यांचा गद्दार असा उल्लेख केला. त्यानंतर काटे यांनीही खैरे यांच्यावर पलटवार करीत खैरे सतत विरोधकांशी संधान साधून असतात, अशी टीका केली. त्याचे पडसाद आता उमटत असून काटे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रकरणी काटे यांनी पोलिसांत तक्रार केल्याचे सांगण्यात येत असून काटे यांच्या घरासमोर पोलीस पोहोचलेले आहेत. दरम्यान येथील वातावरण तणावपूर्ण बनलेले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻