ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
सातव्या दिवशी शासकीय रुग्णालय आणि सिडको परिसरात ब्लँकेटचे वाटप
नांदेड– भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते मायेची ऊब उपक्रमाच्या सातव्या दिवशी मध्यरात्री रस्त्यावर झोपलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवित असलेले ‘मायेची ऊब’ सारखे उपक्रम सर्वत्र होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी बोलताना प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केले.
प्रणिता देवरे यांनी मायेची ऊब उपक्रमात सहभाग घेतला. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील परिसरात अनेक रुग्णांचे नातेवाईक जागेअभावी रस्त्यावर झोपलेले असतात. थंडीपासून बचावासाठी पुरेसे ऊबदार कपडे नसल्यामुळे कडाक्याच्या थंडीत त्यांचे हाल होत असतात. प्रणिताताई देवरे यांनी, अनेक महिला नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेचा विस्तार करण्यासाठी शासनाकडे खा. चिखलीकर यांच्या मार्फत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. ब्लॅंकेट वितरीत करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर, भाजप सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, हनुमान पेठ मंडळ सरचिटणीस कपिल यादव, योगेश निरणे, गणेश उंद्रे, कैलास बरंडवाल, गणेश चंदापूरे, उमेश उंद्रे, ऋषी बेंद्रे, विशाल कदम, राहुल गजभारे, सुरेश निलावार, प्रशांत पळसकर, बिरबल यादव हे उपस्थित होते.
विष्णुपुरी नंतर सिडको परिसरात जाऊन तिथे रस्त्यावर झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर ब्लॅंकेट पांघरण्यात करण्यात आले. भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने दुसऱ्या वर्षी आतापर्यंत साडेतेराशे ब्लॅंकेट ची नोंदणी झाली असल्याची माहिती संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली. नवीन ब्लॅंकेट देणाऱ्यांमध्ये विनोद रमेशचंद्रजी मालू, सौ.लिलादेवी चांडक, गणेश सोवताराम देवासी रबडीवाला, विजय सत्यनारायणजी शर्मा, प्रवीण दत्तात्रय कत्तले टिळकनगर, धीरज ओमप्रकाश शर्मा फरांदेनगर, लक्ष्मण व्यंकना पात्तेवार तरोडा खुर्द, सौ. प्रेमलाबाई व श्री. रामचंद्रराव संगमकर यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ, स्व. सौ.शकुंतला विजय लासीनकर यांच्या स्मरणार्थ, कु.सुखदा व श्रीपदा गजानन लासीनकर, कमलाबाई मदनलाल बियाणी सराफा, दिग्विजय भोम्बळे यांचा समावेश आहे.
संकल्पपूर्तीसाठी आणखी साडेसहाशे ब्लॅंकेट ची आवश्यकता असून चार हजार रुपयाची देणगी दिल्यास देणगीदारांचे वीस ब्लॅंकेट वर नाव छापून त्यांच्याच हस्ते वितरित करण्यात येणार असल्यामुळे दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻