ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
दीर्घायु सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम: तज्ञांचे मार्गदर्शन आणि भव्य आरोग्य प्रदर्शन
नांदेड: दीर्घायू सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्व.पार्वतीबाई बासरे स्मृती आरोग्य व्याख्यानमालेत रविवार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कुसुम सभागृह येथे ऑपरेशन तणावमुक्ती या विषयावर व्याख्यानमाला व आरोग्य प्रदर्शनी आयोजिलेली आहे. व्याख्यानमालेचे हे ८ वे वर्ष आहे.
तसं ताण-तणाव हा दैनंदिन जीवनात नित्याचाच भाग. मात्र कोविडच्या कालखंडाने ताण-तणावाचे रौद्ररूप प्रत्येकाच्या अनुभवाला आले. सध्या तर हा तणाव शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्तरावरही जाणवत आहे. ह्या सर्वव्यापक तणावाचे योग्य रितीने मार्गदर्शन व्हावे याकरिता बहुआयामी व्याख्यांनांचे आयोजन केले आहे.
सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते होईल. यावेळी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, ज्येष्ठ हृदयोग तज्ज्ञ माजी खा.व्यंकटेश काब्दे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात अमरावती येथील प्रयास सेवांकुर संस्थेचे संस्थापक तथा जीवनशैली मार्गदर्शक डॉ.अविनाश सावजी हे सामाजिक व अध्यात्मिक तणाव, मुंबई येथील योगोपचार तज्ज्ञ डॉ.उर्मिला पीटकर या शारीरिक तणाव तर औरंगाबाद येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.आशिष मोहिदे हे मानसिक तणाव या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत आरोग्य प्रदर्शन असणार आहे आणि ५.३० वाजता व्याख्यान होईल. सहभागी होण्याचे आवाहन दीर्घायू सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शिवानंद बासरे, सचिव श्रीनिवास भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻