Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये अवैध बायोडिझेलविरोधात धडक मोहिम सुरूच; जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जप्त केल्या पाच ट्रक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेडच्या बोंढार शिवारात कांदा मार्केटजवळ कारवाई

नांदेड– शहर व परिसरात अवैधरित्या बायोडिझेल विक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीच्या जिल्हाधिकारी  डॉ. विपिन यांनी धडक मोहिम सुरू केली आहे. अवैधरित्या बायोडिझेलचे अड्डे चालविणाऱ्या माफियांविरुद्ध त्यांनी धडक मोहिम सुरू केली असून लाखो रुपयांचे बायोडिझेल जप्त करण्यात येत आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी रात्री पुन्हा धाड टाकली. या कारवाईत पाच ट्रक पकडण्यात आले आहेत. नांदेड शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात अवैधरित्या बायोडिझल विक्री करण्याचे अड्डे मोठया प्रमाणात चालविले जात आहेत. नांदेड शहराच्या सिडको परिसराच्या आसपासचा भाग तर बायोडिझेल विक्रीचे केंद्रस्थान बनला आहे. हा खेळ थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत आक्रमक झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात कारवाईचे सत्रच सुरू केले आहे.

अवैध बायोडिझेलची माहिती मिळताच मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन आपल्या अधिकाऱ्यांसह कांदा मार्केटजवळ पोहचले. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका खाडाखोड केलेल्या नंबरच्या ट्रकमध्ये, पेट्रोलपंपावर लावल्या जाते त्या पद्धतीने डिझेल मोजमाप करण्याचे यंत्र लावलेले दिसून आले. सोबतच या ठिकाणी पाच ट्रक क्रमांक (एम. एच. २६. ए. डी. २५१९.) (एम.एच.१८ बी. ७२०८), (एम. एच.०४ सी.८१८) क्रमांकाच्या अगोदरचा एक नंबर मिटवलेला आहे.) (एम.एच.१२ एन.एक्स. ८७९२) आणि एक नोंदणी क्रमांक नसलेला ट्रक असे ५ ट्रक जप्त करून आणले आहेत.

जप्त केलेले हे सर्व ट्रक जप्त करून सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ही कारवाई केल्यानंतर महसूलच्या अधिकाऱ्यांना या बायोडिझेलमधील अवैध बाबी जमविण्यासाठी बुधवारी २९ डिसेंबर रोजी पहाटेचे ४ वाजले. यावेळी तहसीलदार किरण आंबेकर, पोलीस उपअधिक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे उपस्थित होते. सर्व मोजमाप झाल्यानंतर या प्रकरणाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होणार असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!