Wednesday, January 15, 2025

वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा कुटुंबियांसह जनावरे, बैलगाडी घेऊन महावितरण कार्यालयात ठिय्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात वीज गुल

◆ महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन

अर्धापूर: तालुक्यातील अनेक गावात अंधार पसरलेला असून वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अनेक शेतकरी कुटुंबीयांनी जनावरे, बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढला आहे. बंद असलेला विद्युत पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी अर्धापूर महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे

अर्धापूर तालुक्यातील विशेषतः कोंढा येथील शेतीची वीज गेल्या आठ दिवसांपासुन बंद आहे. डी.पी. सुरू करण्यासाठी शेतकरी दोन दिवसांपूर्वी उपविभागीय अभियंता यांच्याकडे पैसे भरण्यासाठी गेले असता ते पैसे न स्विकारता शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महावितरण अधिकाऱ्यांनी आडमुठी भुमिका घेऊन शेतकऱ्यांना परत पाठवले. शेतकऱ्यांनी विज पुरवठा सुरळीत सुरू करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही निवेदन दिले. पण प्रशासन कोणतीही ठोस भुमिका न घेतल्याने आज दि.३० गुरूवारी रोजी शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रॅक्टरसह महिला व मुलाबाळांना घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शेतकाऱ्यांप्रति महावितरणची अशी कठोर भुमिका का? असा सवाल शेतकरी करत आहेत. गत काही वर्षांपासून शेतकरी वर्ग नापिकी, विविध रोगांचा प्रादुर्भाव अतिवृष्टी व बदलत्या हवामानामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत. पिण्यास देखील पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची विजबिल माफ करणे सोडून मरणयातना सोसणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करून महावितरण शेतकऱ्यांना निजामाप्रमाणे वागणूक देत आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. “पिकली तर शेती, नाहीतर खासाल माती” म्हणत ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे.

यावेळी या आंदोलनात गुणवंत पाटील हंगरगेकर,अँड किशोर देशमुख, अँड.बि.टी.पवार, धर्मराज देशमुख, शिवाजी पवार, बालाजीराव गव्हाणे, पप्पू पाटील, प्रल्हाद इंगोले, मुन्ना कदम यांच्यासह राम कदम, गणेश कदम, रामराव कदम, अशोक कदम, माधवराव कदम, पप्पू कदम, अँड.बालाजी कदम, विनायक कदम, कपील कदम, बंडू कदम, बबनराव कदम, नेहरू कदम, गोविंद कदम, राम दत्तराम कदम, नवनाथ कदम यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे, साईनाथ सुरवसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!