ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ २१ नवीन पदनिर्मितीला मान्यता
नांदेड– राज्य सरकारने औरंगाबाद विभागाचे विभाजन करून नांदेड येथे विभागीय उपायुक्त कार्यालयास मंजुरी दिली आहे. या सोबतच तेथील पदनिर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालय हे औरंगाबादला असल्याने आठ जिल्ह्याच्या कामाचा प्रचंड ताण या कार्यालयावर येत होता.
नांदेड विभागीय कार्यालयांतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्याचे कामकाज चालणार आहे. नांदेड विभागीय कार्यालयात खालील पदांना मंजुरी देण्यात आली आहे. ती अशी: विभागीय उपायुक्त एक, लेखाधिकारी एक, सहाय्यक आयुक्त एक, प्रमुख लेखापाल एक, निरीक्षक एक, कार्यालय अधीक्षक एक, उपलेखापाल एक, दुय्यम निरीक्षक दोन, लघुटंकलेखक एक, वरिष्ठ लिपिक एक, जवान तीन, लिपिक टंकलेखक एक, जवान वाहन चालक दोन तर दोन सेवक अशा २१ पदांना मान्यता देण्यात आली आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. नांदेडमध्ये आता नव्याने हे कार्यालय सुरू होत असल्याने चार जिल्ह्यांच्या कारभाराला आता अधिक गती मिळू शकणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻