ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्यात आल्याच्या निषेधार्थ पंजाब काँग्रेसचा प्रतिकात्मक पुतळा जाळून काल नांदेडमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलन केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या कोरोना महामारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप महानगरप्रमुखांसह अन्य 20 जणांविरुद्ध शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आयटीआय चौक येथे गुरुवार, दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीररीत्या केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारी अनुषंगाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर गर्दी जमवून पंजाब सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करून पंजाब सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलीस हवालदार अहमदखान मियाखान पठाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम 188 भादंवि व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व 135 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे महानगरप्रमुख प्रवीण साले, विजय गंभीरे, ऍड. दिलीप ठाकूर, सुशील चव्हाण, व्यंकट मोकले व इतर दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻