ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
नांदेड/ बाऱ्हाळी- गेल्या चार दिवसांपासुन नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण होते. त्यातच आज दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी मुखेड तालुक्याच्या बाऱ्हाळी आदी काही भागात वादळी वाऱ्यासह तब्बल एक तास गारांचा पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या चार दिवसांपासुन तसे सर्वत्र ढगाळ वातावर पसरले होते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला. यात बाऱ्हाळीसह परिसरात आज दि.१३ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट होऊन नंतर सलग एक तास पाऊस झाला. अनेक भागात तर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. बराच वेळ झालेल्या या पावसामुळे गारांचा सडा पडलेला दिसत होता.
यामुळे शेतातील गुरेढोरे यासह शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रानातील झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या ढिगात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻