ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये covid-19 च्या अनुषंगाने मार्गदर्शन करणेकामी कंट्रोल रूम सुरू करण्यात आलेली आहे. या कंट्रोल रूम चा दूरध्वनी क्रमांक 02462262626 असा आहे.
या ठिकाणी ज्या नागरिकांना Covid 19 लक्षणे आहेत तसेच covid-19 संदर्भात शंकासमाधान करावयाचे आहे, सल्ला घ्यावयाचा आहे, Covid 19 च्या तपासणी च्या अनुषंगाने माहिती घ्यावयाची आहे, Covid 19 च्या औषधांच्या बाबतीत माहिती विचारायची आहे… इत्यादी बाबींसाठी कंट्रोल रूममध्ये डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. Covid 10 च्या नियमावली (अप्रोप्रिएट बिहेवियर) साठी तसेच नागरिकांचे व रुग्णांचे समुपदेशन करणे कामी समुपदेशक (Counselor) कंट्रोल रूम मध्ये उपलब्ध आहे. जे रुग्ण विलगीकरणा (होम आयसोलेशन) मध्ये आहे, त्यांची विचारपूस करणे कामी तसेच त्यांना योग्य तो सल्ला देणे कामी कंट्रोल रूम मध्ये स्वयंसेवक (Volunteer ) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
तरी या द्वारे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यामधील नागरिकांना आवाहन करण्यात येते की covid-19 अनुषंगाने कंट्रोल रूमवर येथे संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻