ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मृतदेह आढळताच जेसीबी चालक पळाला
हदगाव (जि. नांदेड)- येथील शेत सर्वे नंबर 226 येथे संध्याकाळच्या सुमारास जेसीबीने अवैद्य उत्खनन सुरू असताना एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह असलेल्या महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असण्याचे अंदाज वर्तविण्यात आला आहे. हदगावच्या श्री दत्त कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठीमागे शेत सर्वे नंबर 226 मध्ये नाला खोदकाम सुरू आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात अवैध मुरुमाचे हे उत्खनन सुरू होते. दत्तबर्डी संस्थान हदगावच्या पायथ्याशी हे शेत असून येथे मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असते. आज असेच अवैध उत्खनन सुरू असताना, अचानक जेसीबीचा फावडा लागल्यानंतर जमिनीतून महिलेच्या प्रेताचे पाय उघडे पडले. हे पाहताच अवैध उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा कर्मचारी व तिचा ऑपरेटर यांनी तिथून पलायन केले.
ही बाब पोलीस प्रशासनाला कळताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक फलाने तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड बीट जमादार विश्वनाथ हंबर्डे होमगार्ड गणेश गिरबिडे, व इतर पोलीस कर्मचारी केंद्रे घटनास्थळी धावले. पोलीस सदरील प्रकरणाचा तपास करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻