Friday, November 22, 2024

आमदार भाजपचा तरी नायगावमध्ये वसंतराव चव्हाण यांची एकहाती सत्ता; आधी 3 जागा बिनविरोध आणि आता सर्वच्या सर्व जागा जिंकल्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ नायगाव- नायगाव हा तसा काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा गड! पण गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजेश पवार यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी वसंतराव चव्हाण यांची राजकीय घौडदौड जोमाने सुरूच आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षतपदी कार्यरत असलेल्या वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या नायगाव मध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. य मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा असतानाही त्यांनी हे एकहाती यश मिळविले आहे. या नगरपंचायत निवडणुकीत आधी त्यांनी 2 जागा बिनविरोध आणण्याची किमया साधली आणि आता उर्वरित सर्वच जागा जिंकल्या आहेत.

नायगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत 17 पैकी 17  जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. सर्व विजयी उमेदवारांचा माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी सत्कार केला व नायगावच्या जनतेचे आभार मानले आहेत. नायगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा झाली. सर्वप्रथम अटीतटीची वाटणारी निवडणूक नंतर नंतर काही प्रभागात एकतर्फी झाल्याचे वाटत होते. निकालानंतर ते स्पष्टच झाले. या निवडणुकीत भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतल्याने स्थानिक पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारात फारसे दिसले नाहीत. याचा पूर्ण फायदा काँग्रेसने उचलला आणि सक्षम प्रचार यंत्रणा राबवित यश मिळविले. या निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या.


यात प्रभाग क्रमांक एक बोईनवाड आशाताई हाणमंत 357 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक दोन मधून भालेराव शरद दिंगाबर, प्रभाग चार मधून शिंदे सुधाकर पुंडलिकराव, प्रभाग क्रमांक पाच मधून कल्याण शिवाजी शंकरराव, प्रभाग क्रमांक सहा कल्याण मिनाबाई सुरेश, प्रभाग क्रमांक सात मधून सय्यद सखरी हाजीसाब, प्रभाग क्रमांक दहा भालेराव दयानंद ईरबा, प्रभाग क्रमांक आकरा बेळगे विठ्ठल लक्ष्मण, प्रभाग क्रमांक बारा चव्हाण विजय शंकरराव, प्रभाग क्रमांक तेरा मधून चव्हाण अर्चना संजय, प्रभाग क्रमांक चौदा मधून मद्देवाड काशीबाई गंगाधर, प्रभाग क्रमांक पंधरा मधून भालेराव ललिता रविंद्र, प्रभाग क्रमांक सोळा मधून चव्हाण पंकज हांणमंतराव, प्रभाग क्रमांक सतरा शेख मरीयमबी नजीरसाब हे विजय मिळवला आहे

दरम्यान यापुर्वीच तीन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसने एकूण सतरा च्या 17 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. नायगाव नगरपंचायतीवर काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी नायगावात फटाके फोडून जल्लोष साजरा केला. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सर्व उमेदवारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!