ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय
मुंबई– सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत.
त्याचबरोबर आता शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण मोहिम राबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीबद्दलचं सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर जोर दिला गेला पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻