Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये दोन महिने संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरणावर बंदी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड–  संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 16 फेब्रुवारी ते 16 एप्रिल 2022 रात्री 12 वाजेपर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक  असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, आस्थापना, मंदिरे व महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत.
डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड अ वर्गवारी, 
आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड ब वर्गवारी, 
220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा, नांदेड ब वर्गवारी,
दुरदर्शन केंद्र वसरणी नांदेड क वर्गवारी  यांचा समावेश आहे.

महत्वाच्या आस्थापना
 – श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी,  नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड,  रेल्वे स्टेशन नांदेड,  मध्यवर्ती बसस्थानक नांदेड, पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड,  डी मार्ट कॅनाल रोड नांदेड, 400 के.व्ही.विद्युत केंद्र आय.एस.डिव्हीजन, मारतळा-कुंभारगाव ता. लोहा

महत्वाची धार्मिक स्थळे
सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर, संस्थान  माहूर, ता.माहुर जि.नांदेड, दत्तशिखर मंदिर, संस्थान माहूर ता. माहूर जि. नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू  करण्यात आले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!