ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अर्धापुर तालुक्यात टॉवरच्या बॅटऱ्यांवर मारायचे डल्ला
◆ बॅटऱ्यांसह एक स्कॉर्पिओ गाडीही जप्त
नांदेड– मोबाईल टावरच्या बॅटऱ्या व अन्य किंमती साहित्य चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी बॅटऱ्यां, एक स्कॉर्पिओ गाडी असा साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अर्धापूर परिसरातील मोबाईल टॉवर या चोरट्यांचे प्रामुख्याने लक्ष्य असायचे.
दिनांक 21 फेब्रुवारी रोजी राजेश निवृतीराव लोणे यांचे शेतातील इंडज कंपनीचे टॉवर असलेल्या ठिकाणी बॅटरी बँकमधील आमर राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या (किंमत एक लाख ५७ हजार रुपये) चोरीस गेल्या. या प्रकरणी पोलीस ठाणे अर्धापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याबाबतच्या सुचना पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्था. गु. शा. येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार केले होते.
दिनांक 21 फेब्रुवारी रोजी टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारा चोरटा लहान येथे असल्याबाबत गुप्त माहिती व्दारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना इसमास पकडुन चौकशी करण्यासाठी रवाना केले. स्थागुशाचे पथकाने मौजे लहान येथील खंडु रामराव बाभुळकर (वय 32 वर्षे) रा लहान ता. अर्धापुर, गणेश रामराव बाभुळकर (वय 27 वर्षे) रा. लहान ता अर्धापुर, संदीप सिध्दोजी वानोळे (वय 24 वर्षे) रा लहान ता. अर्धापुर, नवनाथा तानाजी मोहकर (वय 32 वर्षे) रा चेनापुर ता. अर्धापुर यांना ताब्यात त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी राजेश लोणे यांचे शेतातील इंडज कंपनीचे टॉवर असलेल्या ठिकाणी बॅटरी बँकमधील आमर राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या (किंमत 1,57,000/- रुपये) स्कॉर्पीओ गाडी क्रमांक (एमएच 26 एन 4944) मध्ये टाकुन चोरुन नेल्याची कबुली दिली. तसेच मोहकर याच्या शेतातील आखाडयावर त्या लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यावरुन स्थागुशाचे पथकाने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हयातील आमर राजा कंपनीच्या बॅटऱ्या व गुन्हयात वापरलेली स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम एच 26 एन 4944 किंमती 4 लाख रुपये असा एकुण 5,57,000/- रुपयाचा माल दोन पंचासमक्ष जप्त केला. गुन्ह्याचे पुढील तपासकामी मुद्देमाल व आरोपींना पोलीस ठाणे अर्धापुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपींकडून अशाचप्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि आशिष बोराटे, पोहेकॉ गंगाधर कदम, पो ना संजीव जिंकलवाड, विठल शेळके, पोकॉ विलास कदम, चालक शंकर केंद्रे यांनी पार पाडली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻